ताज्या बातम्या

ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे जावळी बँक वाढवणे सर्वांचीच जबाबदारी– वसंतराव मानकुमरे.

मुंबई(अजित जगताप ) : जावळी — वाई तालुक्यातील लोकांनी जावळी बँक उभी केली. ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे, माजी आमदार भिकू दाजी भिलारे व मान्यवरांच्या दूरदृष्टीने बँकेची वाटचाल वेगाने सुरू आहे. ही बँक वाढवणे सर्वांचीच जबाबदारी असे प्रतिपादन जावळी बँकेचे नेते व सातारा जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी दादर मुंबई येथे झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.
यावेळी बँकेची निवडणूक लढवण्यासाठी संचालकांना बँकेचे शेअर्स वीस हजार आणि डिपॉझिट दोन लाख रुपये दोन महिन्यापूर्वी जमा करावे लागेल. हा महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे.
या सभेला बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व वरिष्ठ अधिकारी, सभासद तसेच माथाडी नेते शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिव सकपाळ, ज्ञानदेव रांजणे, विठ्ठलराव देशमुख, राजाभाऊ शेलार, उद्योजक विजय शेलार, लक्ष्मण धनवडे, अशोक गोळे, हनुमंतराव रांजणे, संजय निकम, प्रदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांसह उन्नतीचे मॅनेजिंग डायरेक्टर अभिजीत हनुमंत रांजणे यांचाही कुडाळ नगरीचे बँकेचे हितचिंतक ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जावळी बँकेच्या प्रगतीसाठी नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. साताऱ्यात १९५ कोटीचा व्यवसाय वाढ झाली आहे . तीस वर्षाच्या कालखंडात निवडणुकीत अनेकांनी भाग घेतला. काही विजयी झाले काही पडले. मात्र बँकेने पंधराशे कोटीचे टप्पा पूर्ण केलेले आहे. जागतिक युद्धामुळे देशाला फटका बसला. जावळी बँक ३०० कोटीने मागे आली. पण टिकून राहिली.
यापूर्वी भाजप नेत्यांची यशवंत सहकारी बँक ,अजिंक्यतारा सहकारी महिला बँक, श्रमिक बँकेला विलीनीकरणाचा निर्णय घ्यावा लागला. परंतु, ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे जावळी बँकेच्या हितासाठी अनेकांनी चांगले निर्णय घेतले आहेत. काही कर्मचाऱ्यांमध्ये मध्ये गटातटाचे राजकारण असले तरी बँक महत्वाची आहे. आता बँकेचे सभासद वाढवण्यासाठी तसेच ठेवी वाढवण्यासाठी किती जण प्रयत्न करतात? याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले.
आज रोजी ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक उद्योग व्यवसायासाठी पंधरा कोटी कर्ज देत आहे. जावळीतील उद्योजक विजय शेलार यांना सहा कोटी कर्ज दिले. त्यांनी वेळेत हप्ते भरलेले आहेत. बँकेच्या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला नाही तर कारवाई होणार आहे.
ज्यांना संचालक पदासाठी बँकेच्या निवडणूक लढवायची आहे. त्यांनी निवडणूक लढवावी. ही बँक कोणाच्या बापाची नाही तर सभासदांच्या बापाची आहे. असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले. माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे साहेबांचे प्रेम वाढलेले आहे.
जावळी बँकेची ज्यांचा संबंध नाही. ठेवी नाही. असे बँकेच्या निवडणुकीत अर्ज भरतात. त्यांना अखेर सांभाळावे लागते. बँकेचा तोटा होतो. यासाठीच आता ठेवी व भाग भांडवल वाढवण्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी काही ठराविक लोकांसाठी सुख सुविधा पुरवून त्यांना मुंबईला बोलवण्यात आले होते. त्यांची चांगली उठ बैस झाल्यामुळे अनेक आणि धन्यवाद दिले. तसेच बँकेच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल संचालक मंडळाचे ही आभार मानले. वडापाव आणि जेवण खाऊन सभासद येतात. हे नेते मानकुमरे यांनी सांगितले होते. पण प्रत्यक्षात मात्र वेगळे घडले. याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

——————————–

फोटो — बँकेच्या हार्दिक शुभेच्छा सभेत मार्गदर्शन करताना वसंतराव मानकुमरे व सभासद (छाया- निनाद जगताप)

Scroll to Top