ताज्या बातम्या

युवा नेते शेखर गोरे माणदेशी व्यक्ती सोबत राहतील- अभय सिंह जगताप

सातारा(अजित जगताप) : सातारा- सांगली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीने खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. त्यातच भाजपने युवा नेते शेखर गोरे यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी डावल्यामुळे त्यांच्या गटात नाराज आहे. अशावेळी स्वाभिमानासाठी युवा नेते शेखर गोरे हे महाविकास आघाडी सोबत राहतील. असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार व माणदेशी सुपुत्र अभयसिंह जगताप यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकारांच्या प्रश्नाला व्यक्त केला आहे.
सातारा सांगली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्या विचाराचा वारसा जपण्यासाठी आहे. महाविकास आघाडीचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, विश्वजीत कदम, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील व मातब्बर मंडळी श्री अभयसिंह जगताप यांच्या प्रचारासाठी विविध मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
भाजपचे नाव बदनाम करणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात ही लढाई आहे. या लढ्यासाठी शिवसेना (उभाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या घटक पक्षासोबत अपक्ष नगरसेवकांची ही मोलाची साथ लाभत आहे. भाजप सत्ताधाऱ्यांसोबतच युती मधील घटक पक्षांना हुकूमशाह पद्धतीमुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निधी वाटप करताना दुजाभाव केला जात आहे. विकास कामांसाठी निधी जाणीवपूर्वक अडवला जात आहे. या तक्रारी वाढल्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.
यापूर्वी झालेल्या सातारा- सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीत युवा नेते शेखर गोरे यांच्याशी गद्दारी झाली होती.आज ते सर्वेच भाजपमय झालेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पक्षापेक्षाही स्वाभिमानाची निवडणूक असून पूर्वी जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवकांना विकास कामे सुचवण्याचा अधिकार होता. तो ही अधिकार भाजप सत्ताधाऱ्यांनी काढून हुकूमशाही पद्धत आणलेली आहे. असाही आरोप करण्यात आला. महायुती म्हणून मंत्री सोबत असले तरी मतदार हे सत्ताधाऱ्यांना कंटाळलेले आहेत. तिकीट वाटपाबाबतही भाजपने अन्याय केल्याची भावना काहींनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागणार आहे. असे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिली. पूर्वी या ठिकाणी निवडणुका म्हणजे वैचारिक भूमिका होती. तीच भूमिका महाविकास आघाडीची आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. ही सरळ लढत असून भाजपच्या विरोधात जास्तीत जास्त मतदान यासाठी होणार आहे.
भाजप नगरसेवकांनी सुचवलेली कामे सुद्धा केंद्रातून टेंडर काढले जात आहे. जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवकांना काही अधिकार ठेवलेले नाहीत. नगरसेवकांची झाडाझडती घेतली जाते. या विरोधात आता मतदारांनीच आवाज उठवलेला आहे. सातारा जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. वरिष्ठ नेते सुद्धा लक्ष ठेवून आहेत. महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेऊन वैचारिक भूमिका मांडत आहे त्याला उदंड प्रतिसाद लाभत असल्याची स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला वडूजचे माजी नगराध्यक्ष डॉ . महेश गुरव,राष्ट्रवादी निष्ठावंत तानाजी वायदंडे, डॉ. प्रशांत गोडसे, इमू बागवान, धनंजय चव्हाण, नितीन घाडगे ,अजय सानप, विजय शेटे, इम्रान बागवान व सातारा जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक-नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————-

चौकट– लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनीच पुढाकार घेतला पाहिजे. अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. त्याच वेळी पत्रकार परिषद झाली आणि दहा मिनिटानंतर काही पत्रकारांनी भूमिका मांडण्यासाठी घाई केली. या प्रकाराने लोकशाही अधिक बळकट करण्याचा प्रश्न अनुत्तरीत राहिला. त्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

फोटो- सातारा येथे झालेल्या भरगच्च पत्रकार परिषद माहिती देताना महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप (छाया– अजित जगताप सातारा)

Scroll to Top