ताज्या बातम्या
जनहित, कर्मचारीहित आणि मुंबईच्या दीर्घकालीन विकासाला प्राधान्य देत बेस्टचा आराखडा सादर करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजीवली येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न;रामदास आठवले यांची उपस्थितीकराडचा उड्डाणपूल लवकरच होणार वाहतुकीसाठी खुला ९० टक्के काम पूर्ण, कोयना नदीवरील दोन्ही नवीन पूलही सज्ज; कोल्हापूर नाका वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गीजागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘महा आरपेट अभियान’चा दणक्यात शुभारंभ…. दादर चैत्यभूमी येथे शेकडो पर्यावरणप्रेमींची उपस्थितीठाणे पालघर मध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; इतरही महायुतीचेच उमेदवार विजयी होतील – एकनाथ शिंदे यांनी व्यक्त

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पारसिक हिलवर वृक्षारोपण; नवी मुंबईत 2 हजारांहून अधिक देशी वृक्षांची लागवड

नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट आणि अदानी रिअॅलिटी यांच्या सहकार्याने पारसिक हिल येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते 200 हून अधिक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी आयुक्तांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत बकुळ, बाहवा, निंब यांसारख्या देशी प्रजातींची लागवड करून जैवविविधतेला प्राधान्य देण्यात आले. तसेच ‘एक वृक्ष आईच्या नावाने’ या अभिनव संकल्पनेतून प्रत्येक वृक्षासमोर संबंधित व्यक्तीच्या आईच्या नावाचा फलक लावण्यात आला. यामुळे वृक्षारोपणाला भावनिक आणि सामाजिक स्पर्श लाभला.
आयुक्त डॉ. शिंदे यांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून पर्यावरण संवर्धनाची सातत्यपूर्ण चळवळ आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आठही विभागांमध्ये 2 हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात येत असून, वर्षभरात 1 लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. वृक्षांच्या संगोपनासाठी प्रक्रियाकृत सांडपाण्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Scroll to Top