
सातारा : नेपाळ येथील पोखरण एशियन थाई बॉक्सिंग स्पर्धेत वाई भीम नगर येथील भीमकन्या कुमारी स्वराली राम भोसले हिने एशियन थाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाकडून दमदार कामगिरी केलेले आहे. याबद्दल नेपाळचे क्रीडा मंत्री गोविंद बहादूर नेपाली, स्पोर्ट डेव्हलपमेंट प्रमुख दीपक बहादुर गोदार तसेच प्रशिक्षक पाशा अत्तर यांच्या हस्ते भीम कन्या स्वराली भोसले हिचा गौरव करण्यात आला.
वाई येथील भीम नगर मध्ये राहणाऱ्या कुमारी भीमकन्या स्वराली राम भोसले ही जनता हायस्कूल चांदक विद्यालयातील विद्यार्थिनी आहे .तिला वाई येथील प्रशिक्षक वजीर शेख यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल अनेक मान्यवरांनी तिचे कौतुक केले आहे. सध्या सन्मानाचे रौप्य पदक मिळवून खऱ्या अर्थाने भारताच्या तिरंगीचे नाव नेपाळ देशात उज्वल केले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्ष महासचिव दादासाहेब ओव्हाळ ,सातारा जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ व रामभाऊ मदाळे, संतोष नलावडे, राजेंद्र ओव्हाळ आणि ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, विशाल कदम व वाई तालुक्यातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भीमकन्या कुमारी स्वराली राम भोसले हिचे मनापासून कौतुक केले आहे.
………………………………
फोटो– नेपाळ येथे पदक मिळवणारी भीम कन्याकुमारी स्वराली भोसले (छाया– अजित जगताप, सातारा)



