ताज्या बातम्या

कराड ग्रामीण क्रिकेट प्रिमियर लीग २०२६ ‘पर्व ४.०’ ला १७ एप्रिलपासून सुरुवात

नवी मुंबई : कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘कराड ग्रामीण क्रिकेट प्रिमियर लीग २०२६ (KGPL 4.0)’ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, दि. १७ एप्रिल ते रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ दरम्यान करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या खेळातील कौशल्याला चालना मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, या स्पर्धेला क्रिकेटप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या स्पर्धेचे संस्थापक श्री. मोहनराव नायकवडी (मामा) असून, अध्यक्षपदी श्री. अमितराज चव्हाण कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली KGPL 4.0 स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे.
तरी परिसरातील सर्व क्रिकेटप्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Scroll to Top