ताज्या बातम्या

वाई येथे स्वागतासाठी नव्हे तर सोमवारी नूतन सभापती सौ शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा..

वाई(अजित जगताप

: दक्षिण काशी समजणाऱ्या वाई मधील बावधन जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या सौ. ऋतुजा विराज शिंदे यांची भाजपने सातारा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती पदावर निवड केली आहे. ही निवड गद्दारीने झाल्याचा आरोप करून सोमवार दिनांक ६ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात मोर्चाचे आयोजन केले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या कुटील राजकारणाचा पर्दाफाश त्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरण्याची चर्चा सुरू झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सातारा पोलीस व भाजप यांच्या युतीने राष्ट्रवादी व शिवसेनेला रोखले होते. या बाबत विधिमंडळाच्या उन्हाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशीपूर्वीच सातारा जिल्हा परिषदेचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बंद असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाने पत्राद्वारे स्पष्ट केली. यामुळे भाजपच्या या राजकीय कट कारस्थानाला प्रशासन बळी पडल्याचे सिद्ध झाले आहे. पक्षीय बलाबल पाहता शिवसेना १५ राष्ट्रवादी २० काँग्रेस व शेतकरी संघटना प्रत्येकी एक या विरोधात भाजपकडे २८ सदस्य होते. निवडणुकीच्या शुक्रवार दि: २० मार्च रोजी राष्ट्रवादीचे दोन सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीच्या मतदानापासून वंचित ठेवले होते. त्यामुळे भाजपला ही दोन्ही पदे मिळाले. पण त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती. अशी चर्चा खुलेआम सुरू आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीच्या निवडणुकीतही भाजपने कुटील डाव करून राष्ट्रवादीतून फुटून आलेल्या खटाव तालुक्यातील बुध जिल्हा परिषद गटातील सौ लता कर्णे व वाई तालुक्यातील बावधन गटातील सौ. ऋतुजा विराज शिंदे यांना सभापती पदाला संधी दिली आहे. ही राजकारणाची पायमल्ली ठरली आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारला तिलांजली देऊन भाजपने नवा राजकीय कमळ फुलवले आहे. त्याला सुगंध नाही. तर कुडाच्या पाकळ्या आहेत . अशी टीका राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक ६ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नूतन सातारा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. ऋतुजा शिंदे यांच्या विरोधात मोर्चा आयोजित केल्यामुळे राजकारण ऐन उन्हाळ्यात चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार ऋतुजा शिंदे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन काका पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते. या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तरीसुद्धा सभापती पद भाजपने देऊन आपली राजकीय पातळी आणखीन घसरवली आहे. अशी टिका वाईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या एका गुन्ह्या संदर्भात स्वतः विराज शिंदे यांनी सहभाग घेतला होता. विराज शिंदे हे राष्ट्रवादीचे असले तरी त्यांचे सासरे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. मंत्री गोरे हे सुद्धा काही काळ काँग्रेसचे आमदार होते. त्यामुळे ही गद्दारीची नाळ जुळली असल्याचे काही राजकीय विश्लेषक विश्लेषण करत आहेत त्यामध्ये ही तथ्य आढळून आले आहे. ………………………………….

फोटो– वाई येथील मोर्चासाठी व्हिडिओ क्लिप व पोस्टर जळकत आहे.

Scroll to Top