ठाणे : क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या चतुर्थ वर्धापनदिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. राजन पवार, सचिव श्री. अविनाश पवार, खजिनदार श्री. विकास पवार, उपाध्यक्ष श्री. संतोष पवार, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख श्री. अनिल दळवी, सोशल मीडिया अध्यक्ष श्री. स्वप्निल पवार, जेष्ठ धार बांधव दत्ताराम पवार, श्री प्रणय पवार ठाणे रेल्वे स्टेशन मॅनेजर देवधर मॅडम, रेल्वे अधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्ताचा प्रत्येक थेंब गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरतो, या भावनेतून तरुणांसह नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला जेष्ठ धारपवार बांधव, विश्वस्त, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे एखाद्याचे जीवन वाचू शकते,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संस्थेच्या सामाजिक व सेवाभावी कार्याला नवी प्रेरणा मिळाली.




