ताज्या बातम्या

जावळीत गट तट बाजूला ठेवून भाजप उमेदवार निवडून द्या- मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

कुडाळ(अजित जगताप) : भाजप पक्षाच्या माध्यमातून सातारा जावळी मतदारसंघात भरपूर विकास कामे केलेली आहे. जिल्हा परिषद मतदार संघाला यापूर्वी गालबोट लागली होते. ही वस्तू स्थिती आहे. त्यामुळे गट तट बाजूला ठेवून मी दिलेला उमेदवार निवडून दिला पाहिजे. असे नम्र आवाहन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी कुडाळ येथे झालेल्या प्रचार सभेत केले.
कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या उमेदवार सौ. जयश्रीताई सुहास गिरी व इतर पंचायत समितीच्या दोन उमेदवारांच्या प्रचारानिमित्त ते बोलत होते. यावेळी मंचकावर आदरणीय सुमित्राताई राजेंद्र शिंदे, वसंतराव मानकुमरे , दत्ता पवार,सौ . जयश्री ताई गिरी, सुहास गिरी,मच्छिंद्र मुळीक, अनिता समाधान गायकवाड, हिंदुराव तरडे, राजेंद्र फरांदे पाटील, मुरलीधर शिंदे, प्रवीण देशमाने, समीर आत्तार, एकनाथ रोकडे, अंकुश शिवणकर, राहुल माने, शब्बीर भाई पठाण, सुजित शिवणकर, नितीन खरात, राजेंद्र शिवणकर, नामदेव भिसे, लाला वंजारी, विजय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सार्वजनिक सार्वजनिक जीवनात काम करत असताना आमदार म्हणून चांगले रस्ते चांगले पाण्याचे सुविधा शाळेच्या खोल्या समाज मंदिर ग्रामपंचायत इमारत आणि शेतीला पाणी या विकासाच्या संकल्पना मांडल्या. ती कामे पूर्ण करून पंधरा वर्षात मतदार संघाचा कायापालट केलेले आहे. म्हणूनच आम्ही तयार केलेल्या पूलवर रस्त्यावरून भरता वेगाने वाहने चालवत विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. आमचा विजय निश्चित आहे. काही जणांना निवडणुका आल्या की जनतेची आठवण होते. त्यानंतर ते पुढील निवडणुकीतच आपल्याशी संवाद साधतील. अशाच पासून सावध राहिले पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून माळी समाज व सर्व समाजातील धार्मिक वास्तु निर्माण केलेले आहेत. भविष्यातही मतदारसंघाच्या विकासासाठी झटणार आहे असे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी स्पष्ट करून भाजपच्या जावळी तालुक्यातील सर्व उमेदवारांना विक्रमी मताने निवडून द्या. असे जाहीर आवाहन केले. याला उदंड प्रतिसाद लाभला.
सुहास गिरी म्हणाले मी आत्मशांतीच्या वेळेस स्पष्टपणे सांगितली होती की पक्ष जी माझ्यावर जबाबदारी दिली की मी समर्थपणाने पार पाडणार आहे. माझ्या कुटुंबावर ती जबाबदारी वाढल्यानंतर मी परिपूर्णरित्या व्यवसायात लक्ष केंद्रित केले आता बाबांनी जे आमच्या जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारी व विश्वासावर कढई पी तडा जाऊ देणार नाही आम्ही गिरी कुटुंबीय खुश व समाधानी आहोत. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. असे सांगून सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कुडाळ जिल्हा परिषद गट व कुडाळ गण व सायगाव गणातील भाजपचे कट्टर समर्थक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झालेले खऱ्या अर्थाने हा विजय मेळावा ठरला होता. उदंड प्रतिसाद लाभल्यामुळे अनेकांची भाषणे झाली. त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांनी ही आपले मनोगत व्यक्त करून परिवर्तनाची लढाई जिंकली . कुडाळ येथे झालेल्या जाहीर सभेच्या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण कुडाळ परिसर हा भाजपमय झाल्याचे दिसून आले.

——– ——- —–

फोटो कुडाळ तालुका जावली या ठिकाणी जाहीर सभेत मार्गदर्शन करताना शिवेंद्रसिंह राजे भोसले व मान्यवर (छाया- अजित जगताप सायगाव)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top