ताज्या बातम्या

मेदरराम आदिवासी पाड्यातील साममाक्का–सारक्का यात्रेत स्वच्छतेचा आदर्श; मुलगु जिल्हा कलेक्टरांकडून संगम प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष कौतुक

प्रतिनिधी :

तेलंगणा राज्यातील मुलगु जिल्ह्यातील मेदरराम या आदिवासी पाड्यात भरलेल्या साममाक्का–सारक्का या प्रतिष्ठेच्या यात्रेत करोडो भाविकांची सेवा बजावताना कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमासाठी संगम प्रतिष्ठानचे स्वयंसेवक व पदाधिकारी यांनी राबविलेल्या कार्याचे मुलगु जिल्ह्याच्या कलेक्टर यांनी विशेष कौतुक केले.
यात्रेच्या काळात भाविकांमध्ये वेस्ट मॅनेजमेंट, सुका–ओला कचरा वर्गीकरण आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी संगम प्रतिष्ठानने सातत्यपूर्ण जनजागृती केली. या कार्याचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही प्रशंसा व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकामध्ये गेल्या १२ वर्षांपासून सुका कचरा वर्गीकरण विषयावर अधिकृतपणे कार्यरत असलेल्या संस्थेच्या सचिव अ‍ॅड. कोमल तानाजी घाग आणि त्यांच्या टीमचे मेदरराम येथे भरभरून स्वागत करण्यात आले. स्वच्छता व शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी केलेल्या दीर्घकालीन योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
साममाक्का–सारक्का यात्रेत स्वच्छतेचा हा आदर्श उपक्रम भविष्यात इतर मोठ्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top