प्रतिनिधी : येत्या ४८ तासांत मान्सून अंदमान-निकोबार तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
तसेच राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मुक्काम आणखीच वाढणार असून येत्या २४ मे पर्यंत अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार यामध्ये मराठवाडा, विदर्भात सर्वांत अधिक अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी ?
हवामान खात्याने नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येत्या २४ मेपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे.
याशिवाय जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.