ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

तंजावर-महाराष्ट्र मनोमिलनासाठी बाबाजीराजे भोसले यांचा पुढाकार

मुंबई(सदानंद खोपकर) “तंजावरमधील मराठी भाषिकांना त्यांच्या मूळ महाराष्ट्रातील गावांची ओळख होणं आवश्यक आहे. तंजावर आणि महाराष्ट्र यांच्यात मनोमिलन व्हावं, रोटी-बेटीचे संबंध दृढ व्हावेत,” अशी भावनात्मक प्रतिक्रिया तंजावरचे सध्याचे महाराज बाबाजीराजे भोसले यांनी आज येथे व्यक्त केली.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात बाबाजीराजे भोसले यांनी भेट दिली. अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

तंजावरमधील मराठी संस्कृतीचे जतन

महाराज भोसले म्हणाले की, “तंजावरमध्ये सध्या सुमारे तीन लाख मराठी भाषिक राहतात. काळ बदलला असला तरी आजही घरोघरी मराठी बोली जाते, सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. गोंधळ, भारूड, लावणी, फुगडी यांचा तिथे भरघोस प्रभाव आहे. समर्थ रामदास स्वामींचा मठ आणि कविंद्र परमानंदांचे ‘शिवभारत’ याची मूळ प्रत सुद्धा तिथे आहे.”

“मोडी शिकवणाऱ्यांची गरज”

“तंजावरमध्ये शेकडो वर्षांपूर्वीची मोडी लिपीतील कागदपत्रे उपलब्ध आहेत. ती वाचण्यासाठी मोडी जाणणाऱ्या जाणकारांची अत्यंत गरज आहे. मोडी अभ्यासक महाराष्ट्रातून पाठवावेत,” असे त्यांनी सुचवले.

संमेलन घेण्याचा विचार

तंजावरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा विचार सुरु असून, “मराठीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी हे पाऊल उपयुक्त ठरेल,” असे आश्वासन महाराजांनी दिले.

शरद पवार यांची आठवण

बोलताना त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली. “मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री असताना त्यांनी तामिळनाडू सरकारला तंजावरकर मराठी बांधवांचा विचार करा, असे सांगितले होते,” अशी आठवण त्यांनी सांगितली

Scroll to Top