ताज्या बातम्या
‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणीमाजी पंतप्रधान स्व. चंद्रशेखर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त २३ जून रोजी मुंबईत व्यापक बैठकपुणे-नाशिक महामार्गाला समांतर रेल्वेसाठी शासनाने पुढाकार घ्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनएअर इंडिया बिल्डिंगमधील ५० कंत्राटी कामगारांना दिलासा; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सहकार सेनेची यशस्वी पाठपुरावापुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ

रेल्वे प्रवाशांना परवडेल असे जेवण मिळणार ‘या’ स्थानकावर

मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) सहकार्याने प्रवाशांसाठी स्वस्त दरात जेवण उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार अनारक्षित डब्यांमध्ये स्वस्त दरात जेवण आणि नाश्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 20 ते 50 रुपयांमध्ये रेल्वे प्रवाशांना जेवण उपलब्ध होणार आहे.उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना स्वस्तात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. यासाठी रेल्वेच्या अनारक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परवडणाऱ्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या खिशाला परवडेल अशा 20 रुपये किमतीमध्ये नाश्ता मिळेल, तर न्याहारी, जेवणासाठी 50 रुपयांचा दर असेल.नाश्ता, जेवण आणि पाणी प्लॅटफॉर्मवरील अनारक्षित डब्यांच्या जवळ असलेल्या काऊंटरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.खालील स्थानकांवर उपलब्ध आहेत खास फूड काऊंटर?

मुंबई विभाग – इगतपुरी आणि कर्जत भुसावळ विभाग – मनमाड, खंडवा, बडनेरा आणि शेगाव पुणे विभाग – पुणे, मिरज, दौंड आणि साईनगर शिर्डी नागपूर विभाग – नागपूर आणि वर्धा सोलापूर विभाग – सोलापूर, वाडी आणि कुर्डुवाडी

Scroll to Top