ताज्या बातम्या

लालपरी’च्या मार्गफलकावर घोगावचे नाव

कराड : घोगाव ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब ठरली असून, महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या मलकापूर आगारातील नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बस सेवेत दाखल झाल्या आहेत. या बसचे वितरण व उद्घाटन सोहळा माननीय नामदार विनय कोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
विशेष म्हणजे, या पाचही बसच्या रूट बोर्डवर ‘आई रेणुका माता मंदिर, ज्योतिबा नगर (घोगाव, ता. कराड)’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे घोगाव गावाचे नाव एसटीच्या मार्गफलकावर झळकल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मलकापूर आगार, कोल्हापूर विभागाच्या माध्यमातून या नव्या बस विविध मार्गांवर मार्गस्थ करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बांबवडे–कोकरूड–बांबवडे, मलकापूर–कोल्हापूर, कोल्हापूर–मलकापूर तसेच मलकापूर–पंढरपूर–गाणगापूर या मार्गांचा समावेश आहे.
यापैकी मलकापूर–कोल्हापूर पहिली फेरी सुरू झाली असून, प्रवाशांसाठी ही बससेवा अधिक सोयीची ठरणार आहे. तसेच मलकापूर–पंढरपूर–गाणगापूर या धार्मिक मार्गावरील बससेवेमुळे भाविकांनाही मोठी सुविधा मिळणार आहे.
घोगावच्या नावाचा रूट बोर्डवर झालेला उल्लेख हा गावाच्या दृष्टीने विशेष अभिमानाचा क्षण असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. घोगावचे सुपुत्र बाबा साळुंखे (ड्रायव्हर) यांची श्री रेणुका माता बद्दल असलेली अपार भक्ती आणि म्हणूनच घोगावचे नाव इतर ठिकाणी गाजत आहे.त्यामुळे त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे यातून दिसूनच्येत आहे.

Scroll to Top