ताज्या बातम्या
भाजपा नेते प्रसाद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त सायन रुग्णालयात रुग्णांना मोफत चादर वाटपअदानी कंपनीवर धारावी बचाव आंदोलनाचा मोर्चा धडकणार सर्व पात्र अपात्र झोपडपट्टीवासियांना धारावीतच घरे देण्याची जोरदार मागणी कायमशिवसेना प्रणित राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना व वर्ल्ड वाईड ह्यूमनराइट्स ए.एफ या संघटनेतर्फे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची जयंती साजरीमहालक्ष्मी सरस २०२६ : महिलांच्या सशक्तीकरणाचा भव्य उत्सव मुंबईत;२ ते १४ मे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्येडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी गोव्यात तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन

अ‍ॅड.काझी यांच्या’भोवरा ‘ कादंबरीचे २६ रोजी प्रकाशन

मुंबई- नॅशनल लायब्ररी वांद्रे आणि सदामंगल पब्लिकेशन दादर यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅड. शफी काझी यांच्या ‘भोवरा’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा शनिवार २६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता नॅशनल लायब्ररी,वांद्रे येथे पार पडणार आहे.

या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणुन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां अ‍ॅड.मुक्ता दाभोळकर ,अध्यक्षस्थानी माजी महापौर अ‍ॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर आणि विशेष निमंत्रित म्हणुन नाट्यनिर्माते,
दिग्दर्शक अशोक हांडे आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत,तरी साहित्य रसिकांनी या प्रकाशन सोहळ्याला अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन अ‍ॅड. सुनील पाटील यांनी केले आहे.

Scroll to Top