ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

मुंबई काँग्रेसकडून कँडल मार्च काढून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

मुंबई : पहलगाममध्ये पर्यटकांवर करण्यात आलेला भ्याड हल्ला असून हा देशावरचा हल्ला आहे. पाकिस्तान दहशतवादी पोसत असून त्यांना अद्दल घडवण्याचा वेळ आली आहे. सरकारने दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष मुंबई खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.
पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रिगल सिनेमा ते हुतात्मा चौक, कँडल मार्च काढण्यात आला. या मोर्चात वर्षा गायकवाड काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, आमदार अमीन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, वरीष्ठ उपाध्यक्ष प्रणिल नायर, अजंता यादव, अखिलेश यादव, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, महासचिव महेंद्र मुणगेकर, कचरू यादव, अवनीश सिंग, नगरसेवक मोहसिन हैदर, अशरफ आझमी, जिल्हा अध्यक्ष रवी बावकर, मंदार पवार, सुभाष भालेराव, नीता महाडिक, उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आम्ही या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि मृतांच्या नातेवाईंकाप्रती सहवेदना व्यक्त करतो. पण हा दहशतवादी हल्ला झाला त्याची कोणतीच माहिती गुप्तचर यंत्रणांना कशी मिळाली नाही, हे या यंत्रणेचे व मोदी सरकारचे अपयश आहे. निरपराध लोकांना दहशतवादी लक्ष्य करत असताना सुरक्षा यंत्रणा कोठे होती असे प्रश्न उपस्थित होत आहेत.आता तरी भाजपा सरकारने जागे व्हावे व पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतावादाचा कायमचा बिमोड करावा, असे खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Scroll to Top