ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

वाडा येथील दाजी म्हात्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त आरोग्य शिबीर संपन्न

प्रतिनिधी : वाडा शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय उपक्रमात हिरीरीने भाग घेणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळीराम यशवंत (दाजी) म्हात्रे यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त गुरुवारी (दि २० फेब्रुवारी) वाडा शहरातील गणेश मैदान येथे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वाड्यातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि श्रीगणपती आंबामाता मंदिराचे संस्थापक अध्यक्ष बळीराम यशवंत म्हात्रे (दाजी) यांचे तीन वर्षापूर्वी अल्पशा आजारपणामुळे दुःखद निधन झाले त्या निमित्त साई होमिओपॅथीक काॅलेज आणि सद्गुरू नित्यानंद होमिओपॅथीक रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचे आयोजन केले होते.
सर्वसामान्य लोकांना उद्भवनाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर मोफत उपचार करण्यात आले या आरोग्य शिबिराचा तीनशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला असल्याची माहिती दाजी म्हात्रे यांचे चिरंजीव व पत्रकार महेश म्हात्रे यांनी दिली. या प्रसंगी रजनी बळीराम म्हात्रे, डॉ. सुधीर म्हात्रे, नितीन म्हात्रे, महेश म्हात्रे व समस्त म्हात्रे परिवार उपस्थित होते.

Scroll to Top