ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

डॉ. शांताराम कारंडे लिखित दिग्दर्शित आसुड शॉर्टफिल्म चा भव्य प्रीमियर संपन्न

ुंबई : डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फाऊंडेशन प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत कारंडे मोशन पिक्चर्स व सिद्धांत पिक्चर्स निर्मित डॉ. शांताराम कारंडे लिखित, संपादित व दिग्दर्शित आगामी २६ वी मराठी शॉर्टफिल्म “आसुड” चा भव्य “प्रीमियर शो” (Special Screening) रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता वेस्ट व्ह्यू क्लब हाऊस, वेस्ट व्ह्यू सोसा., सेक्टर २, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई- ६७ येथे संपन्न झाला.त्यानंतर रात्री ८ वाजता ही शॉर्टफिल्म प्रसिद्ध अभिनेत्री वनिता शिखरे यांच्या शुभहस्ते आणि प्रसिद्ध रंगभूषाकार श्रीकांत देसाई, अभिनेते निलेश घाडी, व राजा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत युट्यूबवर प्रदर्शित केला. त्यावेळी गाण्यांचा कार्यक्रम राजेश कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली अगदी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे संयोजन कारंडे मोशन पिक्चर्स च्या क्रिएटीव्ह हेड सौ. रेखा मोरे आणि निमंत्रक असलेल्या फिल्मच्या सहनिर्मात्या सौ. संगीता कारंडे व सौ. पूजा सिंह या आवर्जून उपस्थित होत्या. डॉ. कारंडे यांची ही २६ वी शॉर्टफिल्म असून ती पाहिल्यानंतर अनेकांनी तिचे कौतुक केले. त्यावेळी शॉर्टफिल्म मधील कलाकार वनिता शिखरे, करण भदर्गे, दिव्या लोखंडे, कमलेश भालेराव आणि तंत्रज्ञ यांचा डॉ. शांताराम कारंडे यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Scroll to Top