ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

” गरजेचे ” शिक्षण देण्याची सोय शिक्षण संस्थांनी करावी

मुंबई : ” माणसाला काम नाही ” आणि ” कामाला माणूस नाही ” अशा प्रकारच्या शिक्षणापेक्षा ” गरजेचे ” शिक्षण देण्याची सोय शिक्षण संस्थांनी करावी. असे मत गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी विद्यालयाच्या शतक महोत्सवी सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोदूताई जांभेकर विद्यालय प्रशालेच्या शतक महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपादजी नाईक यांच्या उपस्थित पार पडला. संस्थेचे सहकार्यवाह श्रीकांत दुग्गीकर यांच्या हस्ते गोदुताईंची पणती प्रज्ञा जांभेकर आणि नात सून नीता जांभेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

गोदुताई जांभेकर यांचे नातू विजय जांभेकर, नात सून नीता जांभेकर आणि पणती प्रज्ञा जांभेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अँड विलासजी पाटण, अँड विजय साखळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक राजन मलुष्टे तर सूत्रसंचालन संजना तारे आणि आभार अनिल चव्हाण यांनी मानले.

Scroll to Top