ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

ऐरोलीत ‘जातीय प्रतिष्ठे’चा तिरंगी सामना रंगणार

ऐरोलीत ‘जातीय प्रतिष्ठे’चा तिरंगी सामना रंगणार

प्रतिनिधी :  ऐरोली विधानसभेत गणेश नाईक, विजय चौगुले आणि अंकुश कदम यांच्यामध्ये तिरंगी सामना रंगणार असून, हे तिन्ही उमेदवार आपाआपल्या समाजातील नागरिकांच्या मतदानाला घेऊन आत्मविश्वास बाळगून आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीत ‘जात’ फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे.

ऐरोली विधानसभेवर कायम ‘नाईक’ परिवाराचे वर्चस्व राहिले आहे. हा विधानसभा नव्याने निर्माण झाल्यापासून आधी संदीप नाईक व नंतर गणेश नाईक यांनी येथील आमदारकी भूषवली आहे. यावेळी मात्र घराणेशाहीला थेट भिडण्याची तयारी महायुतीचे बंडखोर अपक्ष उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी दर्शवली आहे. तर, दुसरीकडे मराठा आंदोलनातून उदयास आलेले महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम यांनीही दंड थोपटले आहे. या दोघांनीही भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांना कडवे आव्हान उभे केले आहे. भाजपचे गणेश नाईक हे स्थानिक भूमिपुत्र असून ते आगरी समाजातून येतात. तर, बंडखोर अपक्ष उमेदवार विजय चौगुले हे वडार समाजाचे नेतृत्व असून, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम आमदार झाल्यास ते विधानसभेतील मराठा समाजाचे भाग्यविधाते ठरतील अशी चर्चा आहे. त्यामुळे, ऐरोली विधानसभेतील निवडणूक हि पक्षविरहित आणि जात व समाज प्रतिष्ठेची ठरणार आहे.

Scroll to Top