ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

युवा उद्योजक करण नायडू यांनी नवी मुंबई येथील नेरूळ येथे अनाथाश्रम मधील मुलांसोबत साजरी केली दिवाळी

प्रतिनीधी : जीवन ज्योती आशालय, नेरुळ,सेक्टर १६ ए नवी मुंबई. येथील अनाथ मुलांसोबत नवी मुंबईतील तरुण तडफदार युवा उद्योजक करण नायडू यांनी आपल्या मित्र परिवारासह दिवाळी साजरी केली. येते लहान मुलांना नवीन कपडे आणि खाऊ वाटप केले. करण  नायडू यांना सामाजिक सेवा करण्याची आवड असल्याने ते नेहमीच नवी मुंबई येथील सानपाडा येथील अनाथाश्रम,कोपरखैरणे परिसरात असलेले आधार वृध्दाश्रम,आदिवासी पाडा,पनवेल येथील कुष्ठरोगी यांचे वृध्दाश्रम अशा विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकी जोपासत आपली समाजसेवा करत असतात.त्यांच्या कार्याबद्दल त्यांना त्यांचा मित्र परिवार सतत प्रोत्साहन देत असतो.त्यामुळे युवा उद्योजक करण नायडू हे सामाजिक कार्य पार पाडत असल्याचे ते सांगतात. दिवाळी निमित्त त्यांनी नेरूळ येथील जीवन ज्योती आशालय येथे अनाथ मुलांना दिवाळी फराळ,इतर खाऊ तसेच त्या सर्व मुलांना नवनवीन कपडे देऊन त्यांच्यासोबत त्यांनी दिवाळी उत्साहात साजरी केली.यावेळी त्यांच्यासोबत ललित नाईकर, हरिदास सागरे, अनिकेत राठोड, राहुल सावंत, दीपक निवांन,तनुश येथील नैरा आदी मित्र परिवार उपस्थित होता.

Scroll to Top