ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

विवाहित महिलांसाठी सरकार ची जबरदस्त योजना, अकाऊंटमध्ये जमा होणार ५,००० रुपये.

प्रतिनिधी : केंद्रातील मोदी सरकारने गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत सरकार गर्भवती महिलांना 5000 हजार रुपये देते. योजनेतंर्गत गर्भवती महिलांना सरकार कडून आर्थिक मदत दिली जाते. मुलं कुपोषित राहू नयेत, कुठलाही आजार होऊ नये, यासाठी महिलांना मातृ वंदना योजनेतंर्गत पैसे दिले जातात.

या योजनेचे वैशिष्टय काय.

  • गर्भवती महिलांच वय कमीत कमी 19 वर्ष असलं पाहिजे.
  • या योजनेसाठी साठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागेल.
  • 5000 रुपयाची रक्कम सरकार 3 हफ्त्यांमध्ये ट्रान्सफर करेल.
  • या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2017 रोजी झाली होती.

पैसे कसे मिळणार.
लाभार्थी महिलांना 3 टप्प्यांमध्ये पैसे मिळतील. पहिल्या टप्प्यात 1 हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये मिळतील. गर्भवती महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये हे पैसे थेट ट्रान्सफर होतील.

चेक करा सविस्तर माहिती.
तुम्ही खालील अधिकृत संकेतस्थळावर https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana सुद्धा संपर्क करु शकता. इथे तुम्हाला या योजनेबद्दल सर्व माहिती मिळेल.

Scroll to Top