ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

राष्ट्रीय मि‌ल मजदूर संघाद्वारे गणरायांना निरोप!


मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत सालाबादप्रमाणे यंदाही दि.१७ रोजी अनंतचतुर्दशी दिनी दुपारी २ वाजता भायखळा येथील खटाव मिल येथे गणरायांना निरोप देण्याचा समारंभ आयोजित करण्यात आलाआहे.भायखळा खटाव मिल कामगार आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वागत कक्षेत गणेश भक्तांसाठी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.एनटीसीच्या पोदार मिल कामगार प्रतिनिधी आणि कार्यकर्तेही या कामी सहकार्याचा हात देणार आहेत.तेथे‌ मिरवणूकीने‌‌ येणारा “लालबागचा राजा” हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला असून,तेथ रा.मि.म. संघ आणि कामगारांच्या वतीने लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात येईल.संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर बजरंग चव्हाण,सुनिल अहिर, सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे,मारुती शिंत्रे आदी उपस्थित राहून गणरायाच्या निरोप समारंभात सहभागी होतील.संघटनेचे अध्यक्ष,शिवसेनेचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे या प्रसंगी स्वागत करतील!••••

Scroll to Top