ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

नोकरीत कायम करा म्हणून वयोवृध्द झालेल्या १८ हजार महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मुंबई ( रमेश औताडे) : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर असताना महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी व्हावी यासाठी महसूल विभागात लिपिक पदावर पदवीधर तरुण तरुणी असे १८ हजार कर्मचारी घेतले. ते आज वयोवृध्द झाले आहेत. काही मृत पावले आहेत. जे काही जिवंत आहेत त्यांनी आझाद मैदानात आम्हाला नोकरीत कायम करा म्हणून आंदोलन सुरू केले आहे.

२५ वर्ष कंत्राटी म्हणून आम्हाला घेतले त्यावेळी कायम करतो म्हणून जर सांगितले नसते तर आम्ही त्यावेळीच दुसरीकडे प्रयत्न केले असते. काहीतरी व्यवसाय केला असता. मात्र सरकारने गोड आश्वासन देत कायम कामगाराप्रमाणे काम करून घेतले. महसूल विभागातील कायम कामगार व आम्ही करत असलेले तेच काम यामध्ये काहीच फरक नसताना आमच्या वेतनात फरक का ? आम्हाला कायम करण्यात काय अडचण आहे ? असा सवाल सांगलीचे महावीर पाटील यांनी केला.

वयोवृध्द झाल्याने वयोमर्यादा संपली आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी दरमहा २५ हजार रुपये द्यावे. या व इतर ७ मागण्या बाबत सरकारला निवेदन दिले आहे. सरकारने जर आता गांभीर्याने विचार केला नाही तर आंदोलन तीव्र करू असे असे संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष भारती साळवी व उपाध्यक्ष वैशाली राणे यांनी सांगितले.

Scroll to Top