ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

सर्वद फाऊंडेशन तर्फे डहाणूत आदिवासी दिनाचे आयोजन ; आदिवासी बांधवांचा उदंड प्रतिसाद


प्रतिनिधी : जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वद फाऊंडेशनने डहाणू मधील सारणी याठिकाणी आदिवासी नृत्यस्पर्धा आयोजित केली होती कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे पोलीस पाटील नाना लक्ष्मण डगला यांनी श्रीफळ वाढवून आदिवासी पारंपरिक पद्धतीने केले . यानंतर सारणी गावच्या ग्रामस्थांनी सर्वद फाऊंडेशनचे पालघर जिल्हा सचीव श्री. अमीत हिरे, पालघर जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती रूपाली राऊत, सर्वदचे सल्लागार डाॕ. सी. पी. देशमुख , सर्वदच्या संचालिका डाॕ. सुचिता पाटील यांचे पुष्प देऊन स्वागत केले .यानंतर सर्वद फाऊंडेशन संचालिका डाॕ. सुचिता पाटील यांनी आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन आदिवासी भाषा, संस्कृतीचे महत्त्व विषद केले. यानंतर वेगवेगळ्या संघांनी तारपा नृत्य , गौरी नृत्य , कांबड नाच, टिपरी नाच, सांगड नाच, धुमसा नाच, ढोल नाच सादर केले .सुप्रसिद्ध आदिवासी नाटक सोंग काढणे हेही सादर करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश डगला यांनी केले. कार्यक्रमासाठी दिनेश डगला, दिनेश धर्मा डगला, दिनेश सोमण, प्रकाश पाचलकर आदि आदिवासी मंडळीनी परिश्रम घेतले. आदिवासी समाजाची संस्कृती टिकून राहण्यासाठी सर्वदने या कार्यक्रमाचे आयोजन करून भरघोस पारितोषिकही ठेवण्यात आले असे श्री. अमित हिरे व श्रीमती रुपाली राऊत यांनी पत्रकारांना सांगितले .

Scroll to Top