ताज्या बातम्या

१४ सप्टेंबरला कासार कोळवण येथे मनसे तर्फे टिपऱ्या आणि १७ सप्टेंबरला शक्ती- तुऱ्याचा जंगी सामना

मुंबई (शांताराम गुडेकर/मोहन कदम ) : कोकणातील माणूस हा गणेशोत्वात मनसोक्त मजा करतो.कोकणात गणेशोत्सवाचं महत्व अधिक आहे. तसेच गणेशोत्सवात जाकडीनृत्य म्हणजेच शक्तीतुरा नृत्याचे महत्त्व आहे.शक्तीतुरा हे कोकणच्या संस्कृतीचे ठसकेबाज वैशिष्ट्य म्हणावे लागेल. रत्नागिरी,सिंधुदुर्ग रायगड मध्ये हा नृत्य प्रकार मोठ्या प्रमाणात आढळतो.कुणबी समाजा तील श्रमजीवी शेतकरी वर्गाचा हा हक्काचा नृत्य प्रकार म्हणून प्रसिध्द आहे. – नृत्यातला थाट, गाण्याचा तालही व संगीत साधने कालपरत्वे बदलल्याने त्याचं मूळ स्वरुप पूर्णपणे न बदलल्याचा अनुभव हे नृत्य पाहताना येतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील कासार कोळवण गावचे सुपुत्र विजय शंकर करंबेळे(मनसे अध्यक्ष व शारीरिक सेना विभाग प्रमुख ओशिवरा जोगेश्वरी)यांच्या तर्फे आपल्या मूळ गावी म्हणजे कासार कोळवण येथे १५ वर्ष मोठ्या उत्साहात कोकणातील लोककला टिपरी न्युत्य फुगडी, व नाच अशा सांस्कृतिक कार्यक्रमाना प्रोत्साहन देऊन ही कला जतन करून उन्नती वाढविण्याचे काम वडिलोपार्जित करत आले आहेत.यावर्षी गणेशउत्सवामध्ये सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९ वा.साई कृपा टिपरी न्युत्य कासार कोळवण.शाहीर गायिका सौ. पायल प्रशांत करंबेळे यांचा टिपरी नूत्य (फुगडी ) कार्यक्रम सादरीकरण होणार आहे. तर गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी नामांकित बुवा यांचा शक्ती -तुरा जंगी सामना कोकण रत्न पुरस्कार प्राप्त, कॅसेट किंग कवी शक्ती वाले शाहीर संदीप मोरे खेड आणि ॐ सिद्ध सेवा नाच मंडळ धावडे वाडी, हातीवले, राजापूर तुरेवाले कवी शाहीर नितीन गोसावी.राजापूर यांचा रात्रौ ठीक ९ वा. मु. पो. कासार कोळवण(उगवती वाडी), ता. संगमेश्वर, व्हाया- देवरुख जि. रत्नागिरी येथे शक्ती – तुरा डब्बल बारी कार्यक्रम होणार आहे.विजय करंबेळे गेली १५ वर्ष हे सातत्याने होळी उत्सव , गणपती उत्सव कोकनातील सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करून अनेक उपक्रम राबवित आहे. अनेक लोकउपयोगी कामे मुंबई व कासार कोळवण येथे करत आहेत.तरी या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी आपण मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पंचक्रोशीतील तमाम रहिवासी यांना करण्यात आले आहे.कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व अनेक मान्यवर लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.

Scroll to Top