ताज्या बातम्या

संजय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दादर : संजय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, दादर या संस्थेचा ३५ वा वर्धापन दिन आज संस्थेच्या दादर येथील मुख्य कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या कार्यालयात विधिवत पूजा करण्यात आली. संस्थेचे सभासद सचिन मोरडे यांच्या शुभहस्ते पूजाविधी पार पडला. यानंतर संस्थेचे व्यवस्थापक गजानन गावडे यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला.
गेल्या ३५ वर्षांच्या कालावधीत संस्थेने सभासदांचा विश्वास कायम राखत आर्थिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
या वर्धापन दिन सोहळ्यास संस्थेचे कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Scroll to Top