मुंबई : महाराष्ट्र बाजारपेठ परिवाराच्या वतीने ऑगस्ट महिन्यात सभासदांसाठी विविध आकर्षक बक्षिसे, मनोरंजनात्मक कार्यक्रम, सभासदांच्या बैठका तसेच भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे महिला सभासदांना मनोरंजनासोबतच विविध बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
ऑगस्ट महिन्यातील बक्षीस योजनेअंतर्गत स्पॉन्सर महिला सभासदांनी ३ नवीन सभासद केल्यास इमिटेशन ज्वेलरीमधील ठुशी, ५ नवीन सभासद केल्यास नथ, तर १० नवीन सभासद केल्यास नथ आणि ठुशी बक्षीस म्हणून मिळणार आहे. ही बक्षीस योजना १ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
२३ ऑगस्टला भव्य रक्षाबंधन सोहळा
महाराष्ट्र बाजारपेठ प्रस्तुत ‘भव्य रक्षाबंधन सोहळा-२०२६’ रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, भायखळा, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. “मान बहिणींचा… सोहळा रक्षाबंधनाचा!” या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात ग्रुप डान्स स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा रॅम्प वॉक, एक मिनिट गेम शो आणि आकर्षक लकी ड्रॉ यांसह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी महिला सभासदांनी पारंपरिक साडी परिधान करून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्षाबंधन सोहळ्याचे पासेस १६ ऑगस्टपासून महाराष्ट्र बाजारपेठ कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सभासदांनी २० ऑगस्टपूर्वी ९८३३६७८७११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.
विविध सभासदांसाठी बैठका व मनोरंजनात्मक कार्यक्रम
ऑगस्ट महिन्यात MBP Star-1 ते 5 तसेच ठरावीक उत्पन्न घेणाऱ्या लीडर्ससाठी विविध बैठका व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम १८ ते २९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० या वेळेत महाराष्ट्र बाजारपेठ, पहिला मजला, यश प्लाझा बिल्डिंग, दादर पश्चिम, मुंबई येथे होणार आहेत.
तसेच ३० ऑगस्ट २०२६ रोजी ऑगस्ट महिन्यातील वाढदिवस सेलिब्रेशन आयोजित करण्यात आले असून, थेट १० सभासद असलेल्या MBP Star लीडर महिला सभासदांनी आपली नावे कार्यालयात नोंदवावीत, असे कळविण्यात आले आहे.
रेफरल इन्कमबाबत महत्त्वाची सूचना
कॅश रेफरल इन्कम ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत देण्यात येणार आहे. मागील महिन्यांचे किंवा बँक डिटेल्सशी संबंधित प्रश्न असल्यास २६ ते २९ ऑगस्ट या कालावधीत रेफरल इन्कम देण्यात येणार आहे. सिस्टममध्ये बँक डिटेल्स नोंद असलेल्या सभासदांचे रेफरल इन्कम १० ते २० ऑगस्टदरम्यान बँक खात्यात जमा होणार असल्याचे महाराष्ट्र बाजारपेठ परिवाराने कळविले आहे.
जून-जुलै महिन्यांच्या बक्षिसांचे वाटप
जून व जुलै महिन्यांची बक्षिसे १५ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्र बाजारपेठ कार्यालयातून घेता येणार आहेत. संबंधित सभासदांनी स्वतः उपस्थित राहून स्वतःचे बुक सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ३० ऑगस्टनंतर ही बक्षिसे दिली जाणार नाहीत, अशी विशेष सूचना देण्यात आली आहे.
जुलै महिन्यातील बक्षीस योजनेत ३, ५ आणि १० नवीन सभासद करणाऱ्या स्पॉन्सर महिला सभासदांसाठी रेनकोट (पोंचो) देण्याची योजना जाहीर करण्यात आली होती.
कार्यालयीन वेळेबाबत सूचना
२३ ऑगस्ट आणि २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन कार्यक्रम/सणानिमित्त महाराष्ट्र बाजारपेठ कार्यालय व सुपर मार्केट सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच दर सोमवारी आणि महिन्याच्या अखेरीस ३१ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यालय व सुपर मार्केट बंद राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र बाजारपेठ परिवाराने सर्व सभासदांनी वरील कार्यक्रम, बैठका, बक्षीस योजना आणि कार्यालयीन वेळांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.




