मुंबई : ज्येष्ठ अभिनेते, महाराष्ट्र भूषण व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अशोक सराफ यांच्या ८०व्या वर्षात पदार्पणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
अशोक सराफ यांनी आपल्या प्रदीर्घ कलाप्रवासातून मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीचा गौरव करत हा नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार संदीप जोशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
अशोक सराफ यांच्या ८०व्या वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित या सत्कार सोहळ्यात त्यांच्या कला क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.




