ताज्या बातम्या

‘प्रोजेक्ट विद्या’तून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत; एस.एस.एम. शिवाजी विद्यालयात वह्या वाटप

मुंबई(शांताराम गुडेकर) : शिवसेना प्रणीत राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिन व सुलेखन दिनाचे औचित्य साधून एस.एस.एम. शिवाजी विद्यालय, अभ्युदयनगर, काळाचौकी येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा ‘प्रोजेक्ट विद्या’ उपक्रम उत्साहात पार पडला.
शिक्षणाला पाठबळ देण्यासोबतच आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख व विधानसभेचे संघटन प्रमुख दगडू (दादा) सकपाळ यांनी शिक्षण, आरोग्य आणि समाजकल्याणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना व लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन यांच्याकडून सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आयोजन लायन जितेंद्र सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी क्लबचे सचिव लायन संजू ससमल, खजिनदार लायन ज्योती राणे, फर्स्ट व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन होझेफा घाडियाली, फास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन संतोष चौहाण, अधिराज लोकेगावकर, लायन विजय रायमाने, लायन मोहन वायदंडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच शिवसेना शिवडी विधानसभा विभागप्रमुख शशिकांत निकम, महिला विभागप्रमुख रेश्मा सकपाळ गावकर, विधानसभा प्रमुख आकांक्षा गावडे, शाखाप्रमुख संजय गोसावी, राज्य प्रवक्त्या सुषमा सकपाळ राऊत, अनिल खेताडे, धनाजी जगताप, राजेश जैन, लायन नितीन पन्हाळकर, लायन नीरजा सकपाळ, लायन जगदीश नलावडे, लायन दिगंबर पाटील, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Scroll to Top