ताज्या बातम्या
सीएसएमटी–सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेकडून सत्कार“कॅमेऱ्यांना वाहन क्रमांक दिसतो, मग रस्त्यांवरील खड्डे का दिसत नाहीत?” – नागरिकांचा संतप्त सवालराजश्री शाहू महाराज मानधन योजनेतील विलंबाबाबत कलाकारांचा संताप; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनतहसील कार्यालयात तंबाखूचा विळखा; थुंकण्यासह तंबाखूचे ढीग, नागरिकांना स्वच्छतेचे धडे देण्याची गरजयशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ वितरण सोहळा १५ ऑगस्टला वाशीत आमदार चित्रा वाघ, विजय चौगुले, मनोज सानप यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

तहसील कार्यालयात तंबाखूचा विळखा; थुंकण्यासह तंबाखूचे ढीग, नागरिकांना स्वच्छतेचे धडे देण्याची गरज

कराड(प्रताप भणगे) : कराड तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र, काही नागरिकांकडून तंबाखू खाऊन परिसरातच थुंकणे तसेच खाल्लेली तंबाखू उघड्यावर टाकण्याचे प्रकार होत असल्याने कार्यालय परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे.
कार्यालयाच्या परिसरात ठिकठिकाणी तंबाखूचे अवशेष व तंबाखूचे छोटे-छोटे ढीग दिसून येत असल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाऊन थुंकणे अथवा तंबाखूचे अवशेष टाकणे टाळणे गरजेचे आहे.
तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आधी स्वच्छतेचे धडे देण्याची गरज आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत, तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी आणि कार्यालय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शासकीय कार्यालय आपलेच आहे; ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे.

Scroll to Top