कराड : सालाबाद प्रमाणे याही वर्षी शुक्रवार २४ जुलै रोजी श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे श्री संतकृपा इंटरनशनल स्कूल घोगाव या स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी वारकर्याच्या वेशभूषेमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून अध्यात्मिक बोध काय घ्यावा याबाबत संदेश देवून समाज प्रबोधनाचे उत्तम प्रकारे सादरीकरण केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव संत गोरा कुंभार, संत चोखोबा, इत्यादी संतांचे विचार आणि पंढरीच्या विठुरायाचे रूप सर्वामध्ये आहे, हा मानवतेचा संदेश श्री संतकृपा इंटरनशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग, अभंग आणि हरिनामाच्या गजरात साकारलेल्या वारकरी दिंडीतून दिला. या दिंडीमध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी स्कूलच्या प्राचार्या मनीषा हरळीकर मडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन हा आषाढी एकादशीचे औचित्य साधून दिंडी सोहळा यशस्वीरीत्या पार पाडल्या बद्दल संस्थेच्या अध्यक्षा मा.उषा जोहरी मडम, सचिव प्रसून जोहरी सर, प्राजक्ता जोहरी मडम यांनी सर्वांचे कौतुक केले.




