

मुंबई : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधकडॉ. निशिकांत देशपांडे
तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी आणि तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
विधान भवनात अभिवादन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आमदार शिवाजीराव गर्जे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 जितेंद्र भोळे, सचिव-4 शिवदर्शन साठ्ये, सहसचिव राजेश तारवी, उपसचिव विजय कोमटवार, (संचालक, वि.स.पागे), संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
मंत्रालयात अभिवादन मान्यवरांकडून आदरांजली
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, आमदार जयंत आसगावकर, आमदार शिवाजीराव गर्जे, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख आदींसह उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिवंगत पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड, यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.




