सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व किसनवीर आबा यांच्या विचारांची कास धरून कामकाज होत होते. आता सातारा जिल्ह्यात हुकूमशाही पद्धतीने दडपशाहीचा उदय झालेला आहे. नीट पेपर फुटी पासून ते कायदा सूव्यवस्था बिघडली आहे. याचा तीव्र निषेध करण्यासाठी सोमवार दिनांक२० जुलै रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस सह महाविकास आघाडीने एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते धरणे धरणार आहेत. या आंदोलनाला सातारा जिल्ह्यातील अन्यायग्रस्त ग्रामस्थ व नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे नम्र आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी परीक्षा होते.विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित मागण्यासाठी दिल्ली जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची नोंद जगभर घेतली जात आहे. त्यामुळे भाग भाग मोदी असा नारा देऊन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते वांगचुक यांना जबरदस्तीने आंदोलन स्थळावर हलवण्यात आलेले आहे. गोदी मीडिया पासून लोक सावध झालेले आहेत. आंदोलन स्थळाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देणाऱ्या वृत्तवाहिनीला सन्मान दिला जात आहे. तर गोदी मीडियाचे हस्तक असणाऱ्यांना हाकलून लावले जात आहे. ही परिवर्तनाची क्रांती झालेली आहे. आंदोलन चिरडणाऱ्या प्रवृत्तीचा म्हणजेच मोदी सरकार विरोधात साताऱ्यातील महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला नैतिक पाठिंबा जाहीर केला आहे .यासाठी सोमवार दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत लोकशाही मार्गाने शांततेत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. यासाठी महाविकास आघाडीची सर्व घटक पक्ष एकत्र येऊन विचार विनिमय करत आहेत. यासाठी नुकतीच सामुदायिक बैठक संपन्न झालेली आहे. सदर आंदोलनाबाबत रूपरेषा ठरवताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे महायुती शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची तसेच नीट प्रकरणी आत्महत्या केलेल्या ३० विद्यार्थ्यांची कुटुंबांना भरीव मदत मिळणेबाबत मागणी केली जाणार आहे.
सदर धरणे आंदोलनास महाविकास आघाडीचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष व माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यशवंत घाडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, मनसेचे राहुल पवार तसेच पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी व नेते कार्यकर्तेआंदोलनात सहभागी होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील व शहरातील प्रमुख नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आले.
सातारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भवन येथील बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नितीन शिंदे, प्रदेश चिटणीस प्रवीण धसके, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक जिल्हाध्यक्ष समीर राजेघाटगे महिला जिल्हाध्यक्ष अर्चनाताई देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष संजनाताई जगदाळे काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस सादिक बागवान, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सुषमा राजे घोरपडे, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रणव सावंत, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शफीक शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सेल जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, तेजस्विनी केसरकर, वैशाली जाधव, सीमा पवार, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, शिवसेनाचे गणेश अहिवळे ,सुमित नाईक, ज्येष्ठ नागरिक सेलचे बाळासाहेब फडतरे, शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर, विक्रांत पवार, प्रज्ञा गायकवाड,तेजस जाधव इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर धरणे आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून या धरणे आंदोलनाची दखल सरकारला घ्यावीच लागेल. असा विश्वास राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.
————————————————–
फोटो – महाविकास आघाडीच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील धरणे आंदोलनाची जय तयारी पूर्ण…( छाया- अजित जगताप, सातारा)




