ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे हेच कार्यक्षम आहेत मग बाकीचे काय करताहेत ? -बबनराव गाताडे

विशेष लेख : जनआंदोलन कशासाठी आणि कोणासाठी करावयाचे याचा पण विचार झाला पाहिजे! माझा प्रश्न असा आहे की श्री तुकाराम मुंढे हे उच्चपदस्थ अधिकारी या पदावर राहून आपल्या अधिकाराखाली योग्य ती अंमलबजावणी करून भेसळयुक्त असेल किंवा अन्य आणि काही प्रश्न असतील ते आपल्या अधिकाराच्या ताकदीवर कायदेशीर रित्या अंमलबजावणी करून लौकिक प्राप्त करीत आहेत. आता आपल्या देशात श्री. तुकाराम मुंढे यांना शासनाने कायदेशीर रित्या इतके अधिकार दिले नसते तर हे कार्य ते करू शकले असते का?. शिवाय श्री तुकाराम मुंढे यांच्या दर्जाचे तितकेच अधिकार असणारे अधिकारी हे प्रशासनाच्या शुद्धीकरणाचे काम का करू शकत नाहीत ? शिवाय असे निष्क्रिय अधिकारी आपला पगार व नोकरीच्या सुविधा घेतल्याशिवाय कार्य करतात काय? आमच्या मते श्री तुकाराम मुंढे जे प्रशासनातील शुद्धीकरणाचे काम आपल्या अधिकाराच्या ताकदीने करतात तेच काम त्याच दर्जाचे अधिकारी का करू शकत नाहीत? प्रत्येक ठिकाणी श्री तुकाराम मुंढे यांचीच अपेक्षा करणे हे केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे! देशातील जे निष्क्रिय अधिकारी केवळ पगारासाठी व शासकीय सुविधांसाठी नोकरी करत असतील त्यांच्या बाबतीत शासन काय विचार करणार आहे? या परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी श्री तुकाराम मुंढे यांची नेमणूक होण्यासाठी आग्रह धरणे व त्यासाठी आंदोलन करणे ही बाब आमच्या मनाला पटत नाही! खऱ्या शासकीय सेवेचे सारे श्रेय जर श्री तुकाराम मुंडे यांना मिळत असेल तर त्याच दर्जांच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा हा अपमान नाही काय?असे असेल तर अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घेऊन सेवेतून मुक्त करावे आणि त्यांच्या ठिकाणी तुकाराम मुंढे यांच्या सारख्या योग्य, कार्यक्षम, काम करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गदर्शनातून व अन्य प्रशासनातील अनुभवी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून सेवकांची भरती करून शासनाने आपला भार हलका करून जनतेच्या कररूपाने मिळणाऱ्या निधीचा योग्य विनियोग करून आपले कर्तव्य बजावावे असे आम्हाला वाटले तर ती आमचीच नव्हे तर सर्वसामान्य जनतेची भावना अनाठायी ठरणार नाही असे आम्हाला वाटते.

+91 82629 95811(लेखक हे पेठ वडगाव,

जिल्हा कोल्हापूर येथील ज्येष्ठ नागरिक असून ख्यातनाम शिक्षक आहेत).

Scroll to Top