मुंबई : महायुती व विशेषतः भाजपविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठविणा-या राष्ट्रवादी महिला काँग्रेस ( शरद पवार) पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस उषाताई चौधरी यांना फेसबुकद्वारे धमकी देणा-या व्यक्तीविरूध्द योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे करण्यात आली आहे दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील यासंदर्भात गंभीर दखल घेण्याची सूचना नागपूरच्या पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या राष्ट्रवादी महिला काॅग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस व नागपूर शहर उपाध्यक्षा उषाताई चौधरी या .महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षा पासुन सामाजिक व राजकिय शैक्षनिक श्रेत्रात मोलाचे कार्य करत आहेत विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती ,पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळवून देण्याबाबत त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृहांची निर्मिती तसेच सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी 43 कोटीचा निधी मिळवून घेणे, महिलाच्या प्रश्नांवर जंतर मंतर येथे कबड्डी पटू खेळाडूं सोबत आंदोलन करने तसेच गेल्या तीन दशका पासून हुंडाबळी महिलासाठी काम करून पीडीत महिलांना न्याय मिळवून देणे आदी विषयांवर त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे .
चौधरी या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी असल्यामुळे महायुती व विशेषतः भाजपच्या चुकीच्या धोरणांवर त्या लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडत असतात.त्यांच्या या आक्रमक भूमिकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रकाश धोतरकर नावाच्या एका ईसमाने सोशल मिडीयाच्या माध्यमातून हिंदीत गर्भित धमकी दिली.तुम पहले अपना घर देखो और संभालो… कल तुम्हारे यहाँ १० लोग नाश्ता और चाय पीने आ रहे है क्या तुम्हे कबूल है, कबूल है, कबूल है…? जवाब देना बहना कब आये १० लोग । अशा प्रकारे जाहीरपणे गंभीर धमकी दिली.
यासंदर्भात चौधरी यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम , पोलीस महासंचालक सदानंद दाते,तसेच नागपुरातील स्थानिक सोनेगाव पोलीस ठाणे येथे तक्रार देत सबंधित व्यक्तीला अटक करून आपल्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनीदेखील नागपूर झोन क्रमांक १ चे पोलीस उपायुक्त यांना पत्र दिले आहे.चौधरी यांना जाहीरपणे देण्यात आलेल्या धमकी प्रकरणाची गांभिर्याने दखल घेवून पुढील धोका टाळण्यासाठी सबंधित व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.



