ताज्या बातम्या
शिवसेना शिवडी विधानसभा व वैद्यकीय मदत कक्षातर्फे के.ई.एम. रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांचा सत्कारराजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त निबंध स्पर्धा ! पत्रकार राजन पारकर यांनी पटकावला प्रथम क्रमांक ; काव्य स्पर्धेत अमित माने पहिलेमहिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी  ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करण्याचे निर्देश – मंत्री आदिती तटकरेहौसाई विद्यालयात गरीब विद्यार्थिनींना सायकल व ४० विद्यार्थ्यांना सँडल्सचे वाटप; शिक्षणासाठी समाजाने पुढे यावे – राजेश खराटेबल्लाळेश्वर सहकारी पतपेढीचा सभासद प्रशिक्षण सोहळा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीचा सभासद प्रशिक्षण सोहळा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई : नवी मुंबई येथील बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीचा सभासद प्रशिक्षण मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात केमिस्ट भवन, सानपाडा, नवी मुंबई येथे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंद सबाजी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सहकार क्षेत्रातील लोकप्रिय प्रशिक्षण अधिकारी तानाजी पानसकर यांनी संस्थेच्या सभासदांचे हक्क आणि कर्तव्ये याबाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. या सभेस संस्थेचे उपाध्यक्ष भगवान शेटे, संचालक वसंत गावडे, जगन्नाथ दाते, उमेश डोंगरे, निता गावडे, तज्ज्ञ संचालक खंडू आहेर, हर्षल आहेर व संस्थेचे सरव्यवस्थापक संजय घोगरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्थानिक सल्लागार, दैनंदिन ठेव प्रतिनिधी विविध शाखांमधून बहुसंख्येने मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते. या सभासद प्रशिक्षण मेळाव्यास सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, संस्थेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. सोपान डुंबरे, ॲड. अमोल कुरळे, ए.पी.एम.सी फ्रुट मार्केट मधील प्रसिद्ध व्यापारी माणिकशेठ हांडे, सानपाडा विभागातील ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे सरव्यवस्थापक संजय घोगरे यांनी केले. विद्यार्थी गुणगौरव सोहोळ्यात सभासदांच्या ज्या पाल्यांनी १० वी, १२ वी तसेच उच्च शिक्षणामध्ये विशेष प्राविण्य मिळविले, अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करून गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंद गावडे यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत माहिती देऊन सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Scroll to Top