ताज्या बातम्या

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीची बुधवारी साताऱ्यात नियोजन बैठक….

सातारा(अजित जगताप) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शनिवार दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी १०६ व्या जयंतीनिमित्त सातारा शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती
समितीच्या वतीने बुधवार दि.१५ जुलै रोजी रोजी सकाळी साडेअकरा वाजता छत्रपती शाहू महाराज चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सभागृह सातारा येथे बैठक आयोजित केली आहे.
साता-यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. पुर्णाकृती पुतळा बसल्यानंतर होणारी ही पहिली जयंती येत्या सातारा शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी समितीच्या वतीने भव्य पद्धतीने साजरा केली जाणार आहे.
समितीच्या अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. पल्लवी साठे- पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीरांची जयंती साजरी होणार आहे.
यावेळी जयंती समितीचे मावळते अध्यक्ष ऋषिकेश ऊर्फ रावण गायकवाड, संदीप कांबळे, गौरी आवळे, सतीश गाडे, कांतीलाल कांबळे, नंदा भिसे ताई, गणेश वाघमारे , आदित्य गायकवाड , वैभव गायकवाड, मीना साठे , सुनील दुबळे, नागेश ऊर्फ दादा सातपुते, रवि वायदंडे ( फौजी) , डॉ. रमाकांत साठे , अमोल पाटोळे, अजय घाडगे, संदेश कांबळे, महेश वायदंडे, शुभम खंडूजोडे यासह अनेक कार्यकर्ते व लोकशाहीर प्रेमी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सातारा शहरात आरोग्य तपासणी शिबीर, शासकीय योजनांचे माहिती फलक लावणे, रोजगार मेळावा, सामाजिक व सांस्कृतिक व समाजहिताचे कार्यक्रम केले जाणार आहे. ची पूर्ण तयारी व नियोजन करण्यासाठी बुधवारी सकाळी ११.३० वाजता महत्वपूर्ण बैठक होत आहे.
या बैठकीला सातारा जिल्ह्यातील बहुजन समाजातील नेते व समाज बांधव त्यांच्यासह सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जंयती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

————————————————–
फोटो- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समिती अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल डॉ. पल्लवी साठे- पाटोळे यांचा सत्कार करताना मान्यवर (छाया- अजित जगताप, सातारा)

Scroll to Top