ताज्या बातम्या

धगधगती मुंबईच्या बातमीची दखल; तुळसण फाटा येथील ओढ्यावर अडकलेले झाड तात्पुरत्या स्वरूपात हटवले

कराड(प्रताप भणगे) : तुळसण फाटा येथील ओढ्यावरील पुलाला अडकलेले मोठे झाड अखेर संबंधित यंत्रणेने तात्पुरत्या स्वरूपात हटवले आहे. या धोकादायक परिस्थितीबाबत **’धगधगती मुंबई’**ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

ओढ्यात अडकलेल्या झाडामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अडथळला जाण्याची तसेच पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. स्थानिक नागरिकांनीही त्वरित कारवाईची मागणी केली होती.

वृत्ताची दखल घेत संबंधित विभागाने घटनास्थळी जाऊन अडकलेले झाड तात्पुरत्या स्वरूपात हटवले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मात्र, भविष्यात अशा प्रकारची समस्या पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी ओढ्याची नियमित साफसफाई, पुलाची तपासणी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे

Scroll to Top