मुंबई, दि. ८ : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १०० ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५,००० रुपये मानधन दिले जाणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘आपले सरकार‘ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई शहर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापूरे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून, दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग अर्जदारांसाठी किमान वय ४० वर्षे ठेवण्यात आले आहे. अर्जदाराचे कला किंवा साहित्य क्षेत्रातील योगदान किमान १५ वर्षांचे असणे आवश्यक आहे. तसेच वयाने ज्येष्ठ असलेले विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
Post Views: 61