ताज्या बातम्या

सातारा शहरातील बेकायदेशीर होर्डिंग्ज विरोधात भर पावसात रास्ता रोको…

सातारा (अजित जगताप) : छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या सातारा नगरपालिकेमध्ये सध्या लोकशाही पेक्षाही नोकरशाही वर्चस्व गाजवत आहे. तक्रारीची दखल न घेतल्यामुळे शहरांमध्ये अनाधिकृत बांधकाम -, आता त्याच्यामध्ये होर्डिंग्ज लावण्याची हॅट्रिक केली आहे.
आज मंगळवार दिनांक सात जुलै रोजी भर पावसामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाण पोवई नाक्यावरच रास्ता रोको आंदोलन केले. वाहतुकीचा अडथळा, पावसाळ्यात रस्ते बांधकाम आणि त्यात रास्ता रोकोची भर झाली. तरी वाहतूक पोलिसांचे ट्राफिक जाम असल्याचे पाहण्यास मिळाले. ना सातारा नगरपालिका, ना ट्राफिक पोलीस अशी अवस्था रस्त्यात अवघडलेल्या वाहन चालकांची झाली होती. सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, राजवाडा परिसर, राष्ट्रीय महामार्ग सातारा शहरातील प्रवेशद्वार आणि नगरपालिका तसेच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर होल्डिंग लावली जातात. पोवई नाक्यावर हम करे सो कायदा दाखवून दिला जातो. मार्ग क्रमांक सांगणाऱ्या फलकावर सुद्धा राजेरोसपणाने होर्डिंग्ज लावली गेली आहेत.तरीही कोणतीही कारवाई होत नाही. त्याचा निषेध म्हणून भर पावसात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सातारा नगरपालिकेच्या कामकाजाचा आरसा दाखवला.
सातारचे नगराध्यक्ष हे अमोल संधी मिळाल्यामुळे ए.सी. केबिनमध्ये हवा खातात. येणाऱ्यांना आदबीने कॉपी पाजतात . सातारा नगरपालिकेचे मुख्यधिकारी तर कंत्राटी अधिकारी असा विनोद केल्यासारखे वागतात. नगरपालिकेच्या केबिनमध्ये बसतच नाहीत. खुर्चीवर बसल्यावर जळजळ वाटते का ? असा सवाल करण्यात येत आहे.सातारकर करदात्यांना भेटण्यासाठी वेळ देत नाही. आता तर होर्डिंग्ज तक्रारी घेण्यास सुद्धा पुढे आले नाहीत. सामाजिक कार्यकर्ते मोरे यांनी एकेरी उल्लेख करून खऱ्या अर्थाने समाजाचाच प्रश्न रस्त्यावर मांडला आहे. त्याबद्दल त्यांना अनेकांनी धन्यवाद दिले आहेत. सातारा शहर हे पूर्वी पेन्शनरचे होते. आता अनाधिकृत टपऱ्या व.होर्डिंग्ज लावण्याचे शहर बनले आहे. या शहरात किमान शंभर अनाधिकृत होर्डिंग्ज आजही उभे आहेत.
सातारा जिल्ह्यात एकूण ५४३ होर्डिंग्ज असून त्यापैकी ३७२ अनधिकृत (बेकायदेशीर) असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पाहणीत यापूर्वीच उघड झाली होते. पण, कारवाई कुणावरही झाली नाही.सातारा शहर आणि परिसरातील उधारीवर का होईना पण होर्डिंग्ज लावली जातात. सातारा नगरपालिकांच्या हद्दीत ७० ते ७५ अनाधिकृत होर्डिंग्ज आहेत. केवळ हाताच्या बोटावर मोजणे इतकेच होर्डिंग्ज परवानाधारक आहेत.
गेल्या वर्षी घाटकोपर मुंबईतील दुर्घटनेनंतर सातारा पालिका प्रशासनाने सर्व होर्डिंग्ज व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या. आणि हात झटकले. हे हात ओले करण्यास यंत्रणा कार्यरत झाली होती . अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक असूनही ते केले नाही. या आंदोलनामुळे खऱ्या अर्थाने सातारा नगरपालिकेच्या नाकर्तेपणाचेच सातारा शहरातील बेकायदेशीर होर्डिंग्ज लावण्याची वेळ आली आहे. असे नमूद करावे वाटत आहे.

————————————————–
फोटो– सातारा शहरात अनाधिकृत कामाविरोधात सामाजिक कार्यकर्त्याचे रस्ता रोको आंदोलन (छाया- अजित जगताप, सातारा)

Scroll to Top