ताज्या बातम्या

कु. रितिका सु.भोसले कराटे मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराने सन्मानित

मुंबई (शांताराम गुडेकर ) : ग्लोबल पीस कौन्सिल,इंटरनॅशनल ह्युमन राइट्स ॲम्बेसेडर ऑर्गनायझेशन, जागतिक मानवतावादी दिन (World Humanitarian Day) | लंडन हेराल्ड मॅगझिन आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स, नेल्सन मंडेला ग्रेट इंडियन पार्लमेंट अवॉर्ड,नोबेल पीस अवॉर्ड २०२६ तसेच भारत गौरव राष्ट्रीय पुरस्कार सोहळा सोमवार दि.२४ ऑगस्ट २०२६ रोजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर, १०१३, टिळक रोड, दाडावाडी, शुक्रवार पेठ, पुणे, महाराष्ट्र ४११००२ येथे डॉ. अविनाश डी. सकुंडे ( अध्यक्ष – सेंट्रल एज्युकेशनल डेव्हलपमेंट पार्लमेंट कमिटी,आंतरराष्ट्रीय अध्यक्ष – इंटरनॅशनल ह्युमन राइट्स ॲम्बेसेडर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष – ग्लोबल पीस कौन्सिल )यांच्यातर्फे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान पुरस्कार वितरण सोहळा थाटामाटात संपन्न झाला.
या पुरस्कार सोहळ्यात विक्रोळी पार्क साईट येथील डॉ.सुहास भोसले, शिक्षिका सौ.रीता सु.भोसले यांची कन्या कु. रितिका सु.भोसले हिने कराटे मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
रितिका भोसलेने काता व कुमिते या प्रकारात अनेक गोल्ड मैडल मिळवली आहेत.आजवर रितिका सुहास भोसले खेळ – कराटे(वय – २२ वर्षे) हिने आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप बुडोकान कप-२०१८, दुबई, यूएई येथे आयोजित काता आणि कुमिते मध्ये २ सुवर्ण पदके,श्रीलंका-इंडो इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप-२०१८, कॅंडी, श्रीलंका येथे आयोजित काता आणि कुमिते मध्ये २ सुवर्ण पदके,कॅम्पेओनाटो इंटरनॅशनल डी कराटे डो व्हर्च्युअल-२०२० (ऑनलाइन ब्राझील काता चॅम्पियनशिप)काता मध्ये द्वितीय क्रमांक,इंडो-श्रीलंका व्हर्च्युअल काता चॅम्पियनशिप २०२१, काता मध्ये प्रथम क्रमांक,बुडोकान कप-२०२४, दुबई, यूएई येथे आयोजित काता आणि कुमिते मध्ये २ सुवर्ण पदके,राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्वाभिमान भारत कप-२०२३ काता आणि कुमिते मध्ये २ सुवर्ण पदके,इंटरनॅशनल गोसोकू-र्यू कराटे-डो असोसिएशन काता आणि कुमिते मध्ये २ सुवर्ण पदके,देशांतर्गत व राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील पदके १५ – सुवर्ण पदके,१० – रौप्य पदके,०८ – कांस्य पदके,एकूण पदके २६ – सुवर्ण पदके,११ – रौप्य पदके,०८ – कांस्य पदके पटकवली आहेत. रितिका भोसले हिने अनेक सुवर्ण, रजत व कास्य पदक मिळवली आहेत.रितिका भोसलेच्या या यशाबद्दल आणि तिला मिळालेल्या लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार -२०२६ मुळे अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत

Scroll to Top