ताज्या बातम्या

कामगार विरोधी कायदे रद्द करा ! संयुक्त कृती समितीची कामगार मंत्र्यांशी भेट ; आकाश फुंडकरांकडे नोंदविले आक्षेप

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विविध कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीतर्फे कामगारविरोधी कायद्यांबाबत आंदोलन सुरु असून या कायद्यांना मागे घेऊन कामगारांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आज या संयुक्त कृती समितीतर्फे राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन चार श्रमसंहिता व त्याच्यावरील नियम या महत्त्वाच्या विषयाबाबत आक्षेप नोंदविण्यात आले. या बैठकीमध्ये हिंद मजदूर सभेच्या वतीने अध्यक्ष साथी निवृत्ती धुमाळ व सरचिटणीस साथी संजय वढावकर, सिटूचे विवेक माँटेरो व इतर कामगार नेत्यांनी सहभाग घेतला होता.

Scroll to Top