मुंबई : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माहीम परिसरात ज्येष्ठ शिवसैनिक व शिवसैनिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे नियोजन साई सिद्धी संस्थेचे संतोष देवरुखकर आणि अजय कौसाले यांनी केले.
या कार्यक्रमात शिवसेना नेते तथा खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख तथा आमदार महेश सावंत, नगरसेवक साईनाथ दुर्गे आणि महिला विभाग संघटक श्रद्धा जाधव यांच्या हस्ते ज्येष्ठ शिवसैनिक व शिवसैनिकांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, उपविभाग प्रमुख सिद्धार्थ चव्हाण, शाखा समन्वयक रविकांत पडयाची, माहीम विधानसभा संघटक आरती किनरे, विधानसभा समन्वयक रश्मी सुर्वे, उपविभाग संघटक रेखा देवकर, नीता राऊळ, महिला शाखा संघटक रिमा पारकर, माया राऊळ, संजना पाटील, शाखा समन्वयक कल्पना पालयेकर, सुषमा माहीमकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश वराडकर यांचे विशेष सहकार्य लाभले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत शिवसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.




