मुंबई (रवींद्र मालुसरे ) : मुंबई आणि गोवा येथे शैक्षणिक आणि आरोग्यासाठी सेवाभावी वृत्तीने अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कर्जत तालुक्यातील दुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना दरवर्षी मदत केली जाते. लोणावळा येथील नांगरगाव शाळेतील विद्यार्थ्यांना
शाळा दप्तर, रेनकोट, टिफिन बॉक्स, पाण्याच्या बाटल्या, कंपास बॉक्स, पाऊच आणि LEDTV देण्यात आले. शेकडो ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमांस जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध न्यूरो-स्पाइना सर्जन डॉ. पी.एस.रामानी, शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव भूषण जॅक, मनशक्ती केंद्र लोणावळाचे विश्वस्त प्रमोद शिंदे, तसेच ट्रस्टचे विश्वस्त व सदस्य उपस्थित होते.




