ताज्या बातम्या

उपवर्गीकरण विरोधी मुंबईतील दि: 30 जून रोजी महामोर्चासाठी सातारकर सज्ज…..

सातारा(अजित जगताप) : भाजप प्रदीप सरकारच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात ५८ अनुसूचित जाती महामोर्चात सामील होणार आहेत. उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवार दि. ३० जून २०२६ रोजी दुपारी एक महाराष्ट्र विधानभवनावर ऐतिहासिक आणि भव्य ‘महामोर्चा’* निघणार आहे. साठी सातारा जिल्ह्यातील निवासी पाच हजार सामाजिक कार्यकर्ते मुंबईला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.
सातारा येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर अनुसूचित जातीतील प्रतिनिधींची बैठक झाली. हा महामोर्चा मातंग समाजाच्या विरोधात नसून लोकशाहीतील आरक्षणाचे ढाच्या कायम राहवा. जातीयवादी व मनुवादी विचारसरणीला इशारा देण्यासाठी असल्याचे नमूद करण्यात आले.
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस शेजारील मेट्रो सिनेमा, काळबादेवी येथून हा मोर्चा लोकशाही मार्गाने निघणार आहे. या मोर्चासाठी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर सरसेनानी आनंदराज आंबेडकर , राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप आ. राजकुमार बडोले, अ‍ॅड. सुरेश माने ,राष्ट्रीय चर्मकार संघ बाबुराव माने यांच्या उपस्थितीत दि. २२ जून रोजी मुंबई “प्रेस क्लब” दालनात नियोजन बैठक झाली. सर्वच प्रवर्गातील जातींचे उपवर्गीकरण भाजप सरकारला का नको? याचा जाब द्यावा. असे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते विचारणा करू लागलेले आहेत.
मुंबईतील ऐतिहासिक महामोर्चाचा कोणताही त्रास होऊ नये. या मोर्चामध्ये दंगल पेटवण्यासाठी घुसखोरी करणाऱ्यांना पोलिसांनी रोखले पाहिजे. लोकशाही मार्गाने मोर्चामध्ये सामील झालेल्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. असे विविध ठिकाणी नियोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
महामोर्चाच्या नियोजनाचा आढावा संपूर्ण महाराष्ट्रात बैठका घेऊन घेतल्या जात आहेत. आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या ५८ अनुसूचित जातीची ताकद सरकारला दाखवून द्यावी लागेल.त्यासंबंधी समित्या बनवून कामाच्या जबाबदार्‍या वाटून दिल्या. मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वांगीण विचार करून सर्वानुमते ठोस निर्णय घेण्यात आले.
त्यावेळी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक राहुल डंबाळे, (पुणे)प्रतीक कांबळे ,(मुंबई)
प्रविण धसके ,(सातारा) भिमाकोरेगाव याचिकाकर्ते संजय रमेश भालेराव,तसेच विविध संघटनाचे अ‍ॅड. एस. के. भंडारे, विनोद काळे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे, दिव्या ढोले, प्रविण कांबळे, श्री. भगत, सागर संसारे, जगदीश लाड, महेंद्र पवार, किरण निकम, दिपक चौगुले, प्रदीप कांबळे, सम्राटचे कुणाल काबळे , प्रथम गायकवाड इ. मान्यवर पदाधिकारी यांनीही दादर येथील आंबेडकर भवन ऐतिहासिक वास्तू मध्ये बैठक घेऊन चर्चा केलेली आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यात व शहरात विविध राजकीय सामाजिक व सांस्कृतिक धार्मिक चळवळीत काम करणारे अशोक गायकवाड,संजय गाडे, गणपत बोबडे, चंद्रकांत खंडाईत ,पूजा बनसोडे, अमरजीत कांबळे, दादासाहेब ओव्हाळ,रमेश उबाळे, नितीन रोकडे, अंबर खरात, राजेंद्र मोरे, आदित्य गायकवाड, गणेश कारंडे, रेखा सकटे, चंद्रकांत खंडाईत, शांताराम कारंडे, विशाल भोसले, गौतम जाधव, वामन मस्के, सुनंदा येवले, विजय माने ,सतीश गडकरी, सुनील पवार, अनिल जगताप, विशाल कांबळे, विश्वास जगताप, यांच्यासह विविध गावचे कला क्रीडा सास्कृतिक मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी मोर्चाचे नियोजन करत आहेत.

—————————————————————

फोटो– मुंबई व सातारा येथे महामोर्चाच्या नियोजनासाठी झालेली बैठक (छाया- निनाद जगताप व प्रथमेश पुणेकर)

Scroll to Top