ताज्या बातम्या

कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना

कराड : कराड तालुक्यातील घोगाव गावातील रहिवासी शिवाजी दिनकर सांळूखे (वय अंदाजे 45 ते 47 वर्षे) यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, डी.पी.वर जंप घालण्यासाठी ते चढले असता वीजपुरवठा सुरू असल्याने त्यांना जोरदार करंट लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर काही शेतकऱ्यांनी महावितरण (MSEB/MSEDCL) प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला आहे. घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
मृत शिवाजी सांळूखे यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, तीन मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनाने घोगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत चौकशी आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Scroll to Top