महाबळेश्वर : स्वर्गीय मनिषा प्रदीप गायकवाड यांच्या मृत्यू प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी १०५ गाव समाजाच्या शिष्टमंडळाने संबंधित पोलिस ठाण्यात धडक देत निवेदन सादर केले. यावेळी समाजातील पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि शेकडो समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाच्या वतीने पोलिस प्रशासनाकडे मनिषा गायकवाड यांच्या मृत्यूमागील सत्य परिस्थिती उघड करण्यासाठी तातडीने चौकशी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच तपासामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तींविरुद्ध त्वरित गुन्हा दाखल (एफआयआर) करून त्यांना अटक करावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.
या वेळी ह.भ.प. धोंडिबा महाराज (लाखवड), धोंडिबा धनावडे (अध्यक्ष, ३२ गाव समाज, तापोळा), संभाजी जाधव गुरुजी (सचिव, ४५ गाव समाज), संतोष जाधव (चिखली), अशोक जाधव (झांजवड), तुळशीराम शिंदे (नगरेवक, गोरेगाव), गणेश शिंदे (विभागप्रमुख, गोरेगाव), निशांत बुवा सकपाळ (वानवली), नारायण सकपाळ (माजी अध्यक्ष, कोयना वसाहत), शांताराम कदम (सोनाट), सुनील म. जाधव (झांजवड), सोमराज शिंदे (चतुरबेट), सुनील जाधव (पत्रकार, झांजवडवाडी), सुरेंद्र जाधव (चतुरबेट), तानाजी सकपाळ (घावरी), रमेश सकपाळ (शाखाप्रमुख, गोरेगाव) तसेच शिवा लामाजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय १०५ गाव विभागातील महिला कार्यकर्त्या स्वाती शेलार, अनिता सकपाळ, सुजाता कदम यांच्यासह शेकडो महिला व समाजबांधवांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
पोलिस प्रशासनाने या प्रकरणात कोणताही विलंब न करता निष्पक्ष तपास करून न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी उपस्थितांनी केली. समाजाच्या भावना लक्षात घेऊन या प्रकरणात तातडीने आणि पारदर्शक कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.




