ताज्या बातम्या

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शान्ति पटेल यांना अभिवादन ; गोदी कामगारांनी जागवला स्वातंत्र्य सेनानींचा स्मृतिदिन

मुंबई : स्वातंत्र्यसेनानी, माजी खासदार, मुंबईचे माजी महापौर, आणि ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शान्ति पटेल यांचा १२ वा स्मृतिदिन
मुंबई पोर्टमधील गोदी कामगारांच्या वतीने साजरा करण्यात आला. एस.के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली माझगाव येथील कामगार सदनमध्ये हा स्मृतिदिन संपन्न झाला.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने सकाळी ऑरेंज गेट जवळ वाडीबंदर येथे डॉ. शान्ति पटेल चौकामधील डॉ. शांती पटेल यांच्या नामफलकाला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कामगार सदनमधील युनियन कार्यालयात डॉ. शांती पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्मृतिदिनानिमित्त झालेल्या सभेमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲड.एस. के. शेट्ये, जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, खजिनदार विकास नलावडे, उपाध्यक्ष विष्णू पोळ, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, संघटक चिटणीस मीर निसार युनूस, संदीप चेरफळे, मॅनेजिंग कमिटी मेंबर, सतीश घाडी, गुरुदत्त वाळंज, इत्यादी मान्यवरांनी डॉ. शान्ति पटेल यांच्या सामाजिक, राजकीय व कामगार चळवळीतील कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला गोदी कामगार व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Scroll to Top