ताज्या बातम्या

पाटबंधारे अधीक्षक अभियंत्याच्या त्रासाने ठेकेदारांवर उपोषण करण्याची वेळ…

सातारा(अजित जगताप) : निसर्गरम्य पाटण तालुक्यातील तारळी धरण वळण रस्त्याचे काम ठेकेदार विजयसिंह पाटील यांनी जुन २०२२ ला मंजुर झाले होते. सदरचे काम प्रगतीपथावर असूनही
याबाबतच्या देयकाची रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्राची पूर्तता पाटबंधारे विभाग करत नसल्याने तसेच सातारा पाटबंधन अधीक्षक अभियंता यांच्या त्रासाला कंटाळून ठेकेदारावर उपोषणाची वेळ आल्याची माहिती ठेकेदार विजयसिंह पाटील यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
तारळी प्रकल्पासाठी मागील वर्षी कामासाठी आवश्यक असणारे
काँक्रिटसाठीचे मिक्स डिझाईन दि: २ मे ते १४ मे २०२५ ला
गुण नियंत्रण विभागाने तयार करून मंजुरीसाठी अधिक्षक अभियंता सातारा
पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांचेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. सदर
काँक्रिटच्या मिक्स डिझाईनसाठी अधिक्षक अभियंता यांनी दिनांक १३ ऑक्टोंबर रोजी मान्यता दिली. सदर मान्यतेच्या अनुषंगाने पुढील कारवाई दिनांक २ मे रोजी ०२/०५/
होणे गरजेचे होते. तथापि सातारा पाटबंधारे विभागातील अधिक्षक अभियंता व संबंधित
कार्यकारी अभियंता यांनी कोणत्याही कारवाई केली नाही. ठेकेदार विजयसिंह पाटील यांनी तारळी प्रकल्पातील केलेले काम व
त्याचे देयक देणे बंधनकारक असताना अद्यापही त्यांना देयक मिळाले नाही. या गोष्टीला एक वर्ष झाली तरी कुणीही त्याकडे लक्ष देत नाही. मुळे त्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलेला आहे.
अधिक्षक अभियंता व
कार्यकारी अभियंता यांनी जाणीवपूर्वक ठेकेदार विजयसिंह पाटील यांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याच्या
उद्देशाने सदर कारवाई केली नाही. असही आरोप ठेकेदार पाटील यांनी केला आहे. या दोन अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे त्यांना जानेवारी २०२६ रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. तरीही
तदनंतर सुद्धा सहा महिने झाले. कोणतीही कारवाई होत नाही.कामाचे क्षेत्रीय स्थळावर ठेकेदार पाटील यांनी देयक मिळण्याच्या अशाने मिक्स डिझाईन मंजुर झालेनंतर मा. अधिक्षक अभियंता यांच्या सल्ल्याने काम चालू ठेवले होते.
सदरचे काम काही लक्ष
मध्ये असून या कामासाठी ठेकेदार पाटील यांनी कर्ज काढून निधी गुंतवणूक केलेली आहे. अधिक्षक अभियंता यांच्या आडमुठ्या
धोरणामुळे आर्थिक संकट त्यांच्यावर आलेले आहे. पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता यांना वारंवार भेटून वरील
बाबीची पुर्तता करणेसाठी विनंती केलेनंतर करतो… करतो…म्हणून गेले
सहा महिने माझा मानसिक त्रास वाढविलेला आहे. येत्या २-३ दिवसात
कारवाई पुर्ण करून द्यावी. अन्यथा मला आत्मदहन करण्याशिवाय कोणताही
पर्याय राहिलेला नाही. बऱ्याच वेळेला भेटल्यानंतर त्यांनी ठेकेदार पाटील यांनी भेट घेतली त्यावेळेला पुन्हा एकदा काम
करतो… करतो…म्हणत सांगून मला अधिक आर्थिक अडचणीत आणलेला आहे. या विरोधात त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.

—————————————————
फोटो– सातारा पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना ठेकेदार विजयसिंह पाटील

Scroll to Top