मुंबई : महिलांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा देणाऱ्या “ती”चा मार्ग – “ती”ची मा सक्षमा या उपक्रमाचा भव्य अनावरण सोहळा गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता दादर (पश्चिम) येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र बाजारपेठ चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे यांच्या संकल्पनेतून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या सोहळ्याचे अनावरण मुंबईच्या महापौर
सौ. रितूताई तावडे यांच्या प्रमुख हस्ते होणार आहे. तसेच कार्यक्रमाला अभिनेते श्रेयस तळपदे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, एकता लबदे, निर्मिती सावंत आणि पूजा सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमात लाईव्ह सिंगिंग ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले असून संगीत, मनोरंजन आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.
कार्यक्रमासाठी विशेष ड्रेस कोड निश्चित करण्यात आला असून सर्व महिलांनी गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी अथवा ड्रेस परिधान करून उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
महिलांच्या आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र बाजारपेठच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि उद्योजकीय उपक्रम राबविणारे डॉ. कौतिक दांडगे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.




